नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील खामगाव येथील एकाने लोकसेवकास खोटी माहिती दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील खामगाव येथील नथ्थू सापा पाडवी याने ११२ नंबर डायल करुन परिसरातील लोकांनी त्रास दिल्याची खोटी माहिती लोकसेवकास दिली.
याबाबत पोशि.सचिन सैंदाणे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात नथ्थू पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम १८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनायक सोनवणे करीत आहेत.








