नंदुरबार l
नंदुरबार शहरातील 19 व्यायाम शाळेतर्फे आज शहरातुन गणेश विसर्जन मिरवणूका निघणार आहेत त्यामुळे गेल्या दोन वर्षांनतर ढोल तास्यांच आवाज घुमणार आहे.यावेळी कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये, यासाठी पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस्त लाण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मिरवणूका राज्यभर प्रसिध्द आहेत.गेल्या दोन वर्षांनंतर यंदा कोरोनाचे सर्व नियम शिथील करण्यात आल्याने यंदा गणपती उत्सव दणक्यात साजरा होत आहेत.नंदुरबार शहरात आज 28 गणेश मंडळांतर्फे बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे.
यात 19 व्यायाम शाळांचा समावेश आहे.यात 1) विरभगतसिंग व्यायाम शाळा, 2) श्री द्वारकाधीश गणेश मित्र मंडळ, 3) महाराष्ट्र व्यायाम शाळा, 4) जय भारत व्यायाम शाळा, 5.) विरभगतसिंग व्यायाम शाळा, 6.) दादा अनुमान व्यायाम शाळा. 7.) श्री.सच्चिदानंद व्यायाम शाळा, 8 ) शिवलाल भाऊ सोनार पालखी, 9) विर शैव लिंगायात व्यायाम शाळा, 10) आदर्श व्यायाम शाळा, 11) श्रीराम व्यायाम शाळा, 12) वायुपुत्र व्यायाम शाळा, 13) नवजीवन व्यायाम शाळा. 14) संत रोहिदास व्यायाम शाळा, 15) दिगंबर पाडवी आदिवासी व्यायाम शाळा, 16) समर्थ रामदास व्यायाम शाळा. 17 ) जय हनुमान व्यायाम शाळा, 18 ) स्वराज्य व्यायाम शाळा, 19 ) जय संताजी व्यायाम शाळा यांचा समावेश आहे.
मंडळांकडुन तयारी पुर्ण करण्यात आली असुन मोठ्या उत्साहात मिरवणुका काढण्यात येणार आहेत.विविध भागातुन गणपती मंडळाच्या मिरवणुका निघुन मुख्य मिरवणुकीत 19 व्यायाम शाळा सहभागी होणार आहेत.यावेळी कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस ठेवण्यात आला आहे.








