Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळामधील शिक्षकांची १८ हजार पदांची पदभरती करण्यात यावी

team by team
September 5, 2022
in राज्य
0
राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळामधील शिक्षकांची १८ हजार पदांची पदभरती करण्यात यावी
नंदुरबार  l
  राज्यात 2011 पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ही 2019 मध्ये उठविण्यात आली. मात्र साडेतीन वर्षे लोटूनही शिक्षक भरती करण्यात आलेली नाही.म्हणजे ११ वर्षापासून शिक्षक भरती करण्यात आलेलीच नाही. त्यामुळे सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 18 हजारांवर पदे रिक्त आहेत. ग्रामीण व शहरी भागात जिल्हा परिषदांच्या शाळेत गरीबांची मुले – मुली शिक्षण घेत आहे.ज्ञानदान करण्यासाठी शिक्षकच नसतील तर विद्यार्थी कसे शिकतील ? शिक्षकाविना शिक्षण व्यवस्थेचा कणा मोडून जाईल.
भविष्यात पिढी बर्बाद होईल. या पिढीचे भविष्य वाचवून उज्वल करण्यासाठी व जिल्हा परिषदांच्या शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भरती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एकीकडे देशात महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक उंचावण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे, तर दुसरीकडे शिक्षकांचा तुटवडा असताना शैक्षणिक प्रगती कशी साधणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआर`नुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते. सध्या याच पटसंख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी 18 हजारांवर पदे रिक्त आहेत.  2019 मध्ये ‘पवित्र पोर्टल` आणून युती शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 2019 च्या डिसेंबर महिन्यात शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली.
पावणे दोन लाख डीएड, बीएड धारकांनी ही परीक्षा दिल्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या.
 राज्यात मराठी माध्यमाची 16 हजार 748 आणि उर्दू माध्यमाची 1301 पदे रिक्त आहे. ही पदे कालबद्ध कार्यक्रम आखून तात्काळ भरण्यात यावी असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मा.ना.एकनाथ शिंदे  व मा.ना.देवेंद्र फडणवीस याना दिले. यावेळी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष नितीन तडवी   जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश वळवी जिल्हा संघटक अनिल वसावे  सिमादादा तडवी तालुकाध्यक्ष मधुकर पाडवी मनिष वळवी अनिल वळवी तेजस पाडवी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Next Post

नंदुरबार शहरात आज 19 व्यायाम शाळेतर्फे गणेश विसर्जन मिरवणूका

Next Post
नंदुरबार शहरात आज 19 व्यायाम शाळेतर्फे गणेश विसर्जन मिरवणूका

नंदुरबार शहरात आज 19 व्यायाम शाळेतर्फे गणेश विसर्जन मिरवणूका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add