नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सोनार गल्ली परिसरातील मानाचे व नवसाचा श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे गणेशोत्सवनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुमारे 135 वर्षाची परंपरा असलेल्या श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील जनकल्याण रक्त संकलन केंद्राचया सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये वीस इच्छुकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.याप्रसंगी जनकल्याण रक्त संकलन केंद्राचे समन्वयक डॉ.अर्जुन लालचंदाणी यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या युवकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.गणेशोत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमंत बाबा गणपती मंडळ गणेशोत्सव कार्यकारणी परिश्रम घेत आहे








