नंदुरबार l
कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे शिक्षक दिनी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी यांना विविध न्याय मागणी पूर्ततेसाठी निवेदन सादर करणार.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या न्याय, आश्वासित व मान्य मागणीची पूर्तता आणि अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. शासनाने मागण्या मान्य करून देखील आज तागायत अंमलबजावणी झालेली नाही.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागणी बाबतीत शासन स्तरावर काहीच कार्यवाही होत नसल्याने राज्य महासंघ सर्व जिल्हाधिकार्यांमार्फत शासनास निवेदन सादर करीत आहे. तरी त्वरित चर्चा करावी व मागणीची पूर्तता करावी व शिक्षकांमधील असंतोष दूर करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात येणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक ५ सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूल्यांकन पात्र घोषित कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना प्रचलित निकषानुसार तातडीने व रोखीने अनुदान देण्यात यावे, वाढीव पदांना नियुक्ती दिनांक पासून मान्यता वेतन देण्यात यावे, आयटी विषय शिक्षकांना अनुदान व वेतन देण्यात यावे, एक नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या व नंतर सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन आश्वासित प्रगती योजना १०, २०, ३० लागू करण्यात यावी यासह एकूण बारा मागण्यांसाठी निवेदन देणार आहेत.
तरी जिल्हा व तालुका कार्यकारीणी सदस्य, पदाधिकारी प्राध्यापकांनी उद्या ५ सप्टेंबर शिक्षक दिनी ठीक ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जमा होण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष प्रा. एस .एन. पाटील , सचिव प्रा.जी. एन . सोनवणे, कार्याध्यक्ष प्रा उमेश शिंदे व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य यांच्याकडून करण्यात आलेली आहे








