नंदुरबार l
५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु शिक्षकाला दीन समजून त्याची नाहक बदनामी करणार्या आमदार प्रशांत बंब याच्या विरोधात यादिवशी काळ्या फिती बांधून तीव्र निषेध व्यक्त केला गेला पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आहे. ५ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षक दिन साजरा करीत असतांना आपल्या मनातील रोष हा समाजासमोर आणण्याकरिता हाताला काळ्या फिती बांधून शिक्षकविरोधी वृत्तीचा निषेध करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या करण्यात आले आहे.
काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य प्रशांत बंब यांनी सभागृहात जिल्हा परिषद शिक्षकांविषयी अपूर्ण आणि चुकीच्या माहितीच्या आधारे बदनामीकारक कथन केले. यामुळे महाराष्ट्रातील समस्त शिक्षक बंधू भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यासंदर्भात काही शिक्षक बंधू भगिनींनी त्यांना दूरध्वनीद्वारे रोष व्यक्त केला असता त्यांच्याशीही अर्वाच्य भाषेत आमदार बंब यांनी संवाद साधला. महिला शिक्षकांशीही बोलतांना त्यांची भाषा संयमाची दिसून आली नाही. कहर म्हणजे अजूनही या आमदार महोदयांच्या बंबातली आग काही शांत होण्याचे लक्षण दिसत नाही. शिक्षक जातीला बदनाम करण्याचा जणू काही त्यांनी विडाच उचललेला दिसतोय. मुळात स्वतःचे हात भ्रष्टाचाराच्या शेणाने माखलेले असतांना राष्ट्रनिर्मात्या शिक्षकाला बदनाम करण्याची हिंमत या आमदार महोदयांमध्ये आली कुठून?
शिक्षक आपली कामे प्रामाणिकपणे पार पाडत असतांनाही समाजामध्ये भविष्यनिर्मात्या शिक्षकाला सामाजिकदृष्ट्या बदनाम करण्याचे षडयंत्र या आमदार महोदयांनी राबवले आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणूनच व्यक्तीचा नव्हे तर ह्या विकृत वृत्तीचा विरोध आणि निषेध होणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, ‘शिक्षक कभी साधारण नही होता, प्रलय और निर्माण दोनो इसकी गोद मे खेलते है’ तेव्हा राष्ट्राच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणार्या शिक्षकांनो, आता विकृत मानसिकतेचा विरोध करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्या.
नंदुरबार जिल्ह्यात देखील सर्व शिक्षकांनी काळ्याफिती लावून ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी काळ्याफिती लावून आमदार बंब यांचा निषेध नोंदवायचे आवाहन राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड, विभागीय कार्यकारणी सदस्य आबा बच्छाव, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, कार्यवाह किरण घरटे, कोषाध्यक्ष शरद घुगे, प्रकाश बोरसे, धनंजय सूर्यवंशी, दिनेश मोरे,
जगदीश पाटील, संदीप काकुस्ते, जगदीश भागवत, दिनेश पाडवी, किशोर ठाकरे, अशोक बागले, रामू कोकणी, अनिल देवरे, दीपक सोनवणे, दीपक वसावे, सिद्धार्थ बैसाणे, विलास तडवी, मानसिंग पाडवी, भिकन पिंजारी, भिका पावरा, भाईदास पावरा, मनोज चौधरी, राहुल वंजारी, अमोल पाटील, गणेश अचिंतलवार, महिला आघाडीच्या चेतना चावडा, मिनल लोखंडे, सरिता काळे, दीपमाला बागल, भारती आव्हाड यांनी केले आहे.








