Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षक दिनी हाेणार पुरस्कारांचे वितरण

team by team
September 3, 2022
in शैक्षणिक
0
नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षक दिनी हाेणार पुरस्कारांचे वितरण

नंदुरबार | प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणार्‍या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हयातील सहाही तालुक्यातून प्रत्येकी एक व जिल्हा समितीच्या अधिकारात असलेल्या दोन अशा जिल्हा परिषदेच्या आठ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात करण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यावर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी सहा तर जिल्हा समितीच्या अधिकारात असलेल्या प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये दयानंतर विश्‍वंभरराव जाधव (जि.प.शाळा वरुळ ता.नंदुरबार), श्रीमती सुरेखा सेगजी गावित (जि.प.शाळा बर्डीफळी (नांदवण) ता.नवापूर), राजाराम दशरथ पाटील (जि.प.शाळा देऊर ता.शहादा), श्रीमती शितल किशोर शिंदे (जि.प.शाळा तर्‍हावद ता.तळोदा), मोगीलाल खंडू चौधरी (जि.प.उदेपूर खालचे ता.अक्कलकुवा),

लक्ष्मीपूत्र विरभद्रप्पा उप्पीन (जि.प.शाळा काल्लेखेतपाडा ता.धडगाव), तर जिल्हा समितीच्या अधिकारातील प्रोत्साहनपर पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये श्रीमती सुरैय्याबानो मो.इस्माईल (जि.प.शाळा उर्दू क्रमांक २ ता.अक्कलकुवा), धिरसिंग शिवण्या वसावे (जि.प.शाळा माथाअसली ता.धडगाव) यांचा समावेश आहे.

या पुरस्काराचे वितरण दि.५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, गणेश पराडके, अजित नाईक, निर्मलाबाई राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी, डायटचे प्राचार्य जगराम भटकर, उपशिक्षणाधिकारी रविंद्र पाटील, डॉ.युनूस पठान, भानुदास रोकडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथील बस्थानक परिसराची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी

Next Post

नंदूरबार तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनात डॉ.काणे हायस्कूल व डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add