नंदुरबार ! प्रतिनिधी
पवित्र धागा बांधून भाऊ बहिणीचे रक्षण करतो त्याप्रमाणे वृक्ष प्राणवायू देऊन आपले संरक्षण करीत असल्याने भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने रक्षाबंधन निमित्त वृक्षांना राखी बांधून पर्यावरणाच्या संदेश देण्यात आला.
मानवी आयुष्य पर्यावरणावर अवलंबून आहे पर्यावरण आपल्याला चांगले आणि निरोगी आयुष्य देत असते पर्यावरणाचा समतोल राखायचे असेल तर वृक्षांचे संगोपन करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे काल रविवारी रक्षाबंधन निमित्त नंदुरबार येथे ‘विजय पर्व’ जिल्हा कार्यालयात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा किन्नरी सोनार यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी वृक्षांना राखी बांधून पर्यावरणाचा संदेश दिला.
तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व आमदार राजेश पाडवी यांना महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधल्या. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नंदा सोनवणे, मीडिया प्रमुख भावना लोहार, जिल्हा सचिव संगीता पाठक, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मथुरा पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष सपना अग्रवाल, राणी सोनार,नगरसेविका संगीता सोनवणे, महिला शहराध्यक्ष योगिता बडगूजर, शहादा शहराध्यक्ष रोहिणी भावसार, हर्षा सोनार आदी उपस्थित होते.