Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉजबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रविवारी जिल्हा संघ निवड चाचणी

team by team
September 2, 2022
in राज्य
0
डॉजबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रविवारी जिल्हा संघ निवड चाचणी

नंदुरबार  l

 

येथील नंदुरबार जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या वतीने 13 वी सब ज्युनिअर व ज्युनिअर मुले-मुली डॉजबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा संघ निवड चाचणीचे दि.4 सप्टेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या चाचणीत खेळाडूंची निवड करण्यात येणार असून निवड झालेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होईल. या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा डॉजबॉल असोसिएशनने केले आहे.

सांगली जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या सहाय्याने महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली व डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार 13 वी सब ज्युनिअर व ज्युनिअर मुले-मुली डॉजबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि.16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2022 दरम्यान मंगले ता.शिराळा जि.सांगली येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचा संघ देखील सहभागी होणार आहे. यासाठी नंदुरबार जिल्हा डॉज बॉल असोसिएशन यांच्या वतीने  दि.4 सप्टेंबर 2022 रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता नंदुरबार येथील अभिनव विद्यालयाच्या प्रांगणात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावेळी निरीक्षक म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. निवड चाचणीस येणार्‍या खेळाडूंनी जन्माचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. ही स्पर्धा  मुले/मुली वय 17 वर्षाअंतर्गत घेण्यात येणार असून यासाठी खेळाडूंची जन्मतारीख खालील प्रमाणे असावी. सब ज्युनिअर 17 वर्षाआतील दि.01/01/2004 नंतरचा जन्म असावा. निवडलेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेस सहभागी होणार असून या स्पर्धेतुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येईल.

 

 

या निवड चाचणीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा डॉलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बळवंत निकुंभ, उपाध्यक्ष प्रा.ईश्वर धामणे, सचिव योगेश निकुंभ, धनराज अहिरे, निलेश गावित, राजेंद्र भोई, तुषार सोनवणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post

आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिन नाही

Next Post
आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिन नाही

आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिन नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add