Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

team by team
September 2, 2022
in सामाजिक
0
शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट
नंदुरबार  l
नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामसमुहातील वडसत्रा, सागाळी, भादवड येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या सहयोगाने सुरु असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी भेट दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत तहसिलदार मंदार कुलकर्णी, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी जागतिक बॅक अर्थसहाय्यीत याहा आदिवासी नवापूर फार्मस प्रोड्युसर कंपनी, वडसत्रा, नेसू परिसर शेतकरी उत्पादक कंपनी लि., सागाळी, शिवम डेअरी फॉर्म, भादवड पशुखाद्य निर्मिती उद्योग,भात गिरणी, तेलघाणा प्रकल्प अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेट देवून प्रकल्प चालवितांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात सुरु असलेले नाविण्यपूर्ण प्रकल्प हे शेतकऱ्यासाठी पथदर्शी असून असे प्रकल्प जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी सबंधित विभागांने त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाविषयींची व योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रकल्पांच्या संचालकांनी सुरु असलेल्या भात गिरणी, भात पीक उत्पादनवाढीसाठी सुरु असलेले प्रयत्न, रेशीम शेतीतील नाविण्यपूर्ण प्रयोग व तयार झालेले रेशीमकोश उत्पादन, सुधारीत चारा लागवड तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय, मुक्त संचार गोठा, देशी गोपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्पांविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.
यावेळी कंपनीचे संचालक सत्यानंद गावीत, गुलाबसिंग वसावे, कृष्णा गावीत, देवीदास पाडवी, ईश्वर गावीत, विष्णू वसावे, बबन कोकणी, दिलीप कोकणी, सतीश वसावे, हरीश चौधरी, प्रगतशील शेतकरी राजेंद्र वसावे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अशोक वळवी, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे डॉ. महेश गणापुरे, अनिल पाटील, संदीप खेडकर, प्रदीप हिरे, ललीत अहिरे, तुकाराम धनगर, संदीप कोकणी यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, भागधारक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील रिक्त पदे भरुन समस्या सोडवा : सिताराम पावरा

Next Post

गावाच्या वेशीवर वन्य प्राण्याचे दर्शन वाघ की बिबट्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post
गावाच्या वेशीवर वन्य प्राण्याचे दर्शन वाघ की बिबट्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गावाच्या वेशीवर वन्य प्राण्याचे दर्शन वाघ की बिबट्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add