नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून या अंतर्गत दि.२४ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली होती .नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या काल दि.१ सप्टेंबर रोजी शेवटच्या दिवसा अखेर ७५ ग्रामपंचायतीच्या ६१५ सदस्य पदासाठी १ ह्जार ४४७ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ४ गावात लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकेक अर्ज आल्याने या ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची कोरोनामुळे २०२० पासून मुदत संपून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यातच कोरोना निर्बंध असल्याने निवडणुक लांबल्या होत्या. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीसाठी ऑगस्ट महिन्यात निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम घोषीत केला. नंदुरबार तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींचा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीमुळे ग्रामीण भागात वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन सादर करण्यासाठी इच्छुकांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली.
चारचाकी वाहनात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज सादर केले. ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणार्या कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष ,शहराध्यक्ष कार्यकर्त्यांसमवेत हजेरी लावतांना दिसत आहे. नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुकीसाठी ७५ ग्रामपंचायतीच्या ६१५ सदस्य पदासाठी १ ह्जार ४४७ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. तर शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी ७९६ तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी १७१ अर्ज दाखल करण्यात आले.
दरम्यान नंदुरबार तालुक्यातील सुतारे , देवपूर, भवानीपाडा, वरूळ या ४ गावातील लोकनियुक्त सरपंच पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने या ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. वासदरे ४, दुधाळे १, नळखे र्खु. २, नांदखे १७, उमर्दे बु. १, खाडसगाव १, कोळदे १२, पळाशी ३, शिंदे ६, वाघोदा ९ नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले.








