नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कृष्णा नगरात दुचाकी आडवी लावून जबरी चोरी करीत 95 हजार रुपये लांबविल्याप्रकरणी तिघा अनोळखी इसमांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील कृष्णा नगरातील दिलीपभाई रशिदभाई नाईक हे त्यांचा मुलगा याच्यासोबत दुचाकीने जात होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघा अनोळखी इसमांनी दुचाकी आडवी लावून दिलीपभाई नाईक व त्यांच्या मुलगा यांच्या मध्ये ठेवलेली 95 हजार रुपये किंमतीचे शाळेची बॅग जबरीने हिसकावून नेत पळून गेले.
याबाबत दिलीपभाई नाईक यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात तिघा अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.








