Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह 10 पिडीत महिला ताब्यात , स्थानिक गुन्हे शाखेची नंदुरबार शहरात धडक कारवाई

team by team
August 30, 2022
in क्राईम
0
कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह 10 पिडीत महिला ताब्यात , स्थानिक गुन्हे शाखेची नंदुरबार शहरात धडक कारवाई

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दुध डेअरीजवळ कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह 10 पिडीत महिला यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

 

नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दुध डेअरीजवळ दोन महिला ह्या इतर काही पिडीत महिलांकडून पैसे घेवून त्यांच्याकडून अनैतिक व्यापार करुन घेवून गैरकायदेशीर कुंटणखाना चालवीत आहेत , त्यामुळे या गोष्टीचा परिसरात असलेल्या शाळा / महाविद्यालयातील मुले / मुली यांचेवर वाईट परिणाम होत असलेबाबत व सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना प्राप्त झाली होती .

 

 

दि.29 ऑगस्ट 2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दुध डेअरीजवळ दोन महिला ह्या इतर काही पिडीत महिलांकडून पैसे घेवून त्यांच्याकडून अनैतिक व्यापार करुन घेवून गैरकायदेशीर कुंटणखाना चालवीत आहेत.अशी माहिती मिळाल्याने घटनेबाबत सविस्तर माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन सदर ठिकाणाची माहिती संकलित करुन सदर ठिकाणी एकाचवेळी तपासणी करुन ठोस कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले . त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दुध डेअरीजवळ सुरु असलेल्या कुंटणखान्यावर अचानकपणे छापा मारण्याचे नियोजन केले .

 

सर्व कायदेशीर पत्रव्यवहार करुन जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील परिविक्षा अधिकारी व संरक्षण अधिकारी यांना सोबत घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व पथक नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या आजुबाजूला सापळा लावून होते . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीची अधिक खात्री करण्यासाठी एक पंटर ग्राहकास सदर ठिकाणी पाठविले .

 

पंटर ग्राहक यांनी सदर ठिकाणी असलेल्या दोन महिलांशी बोलणी करुन त्या महिलांना रोख रक्कम दिली . बातमीची खात्री झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी 6.30 वा . सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले . तसेच सदर ठिकाणी असलेल्या रुमची पाहणी केली असता त्याठिकाणी 4×6 आकाराचे काही लहान लहान रुम दिसून आले . त्या रुमची पाहणी केली असता तेथे वेगवेगळ्या राज्यांमधून पैसे घेवून अनैतिक व्यापार करण्यासाठी आणलेल्या 10 पिडीत महिला मिळून आल्या .

 

कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिला आरोपी ह्या वेगवेगळ्या राज्यांमधून पिडीत महिलांकडून पैसे घेवून त्यांना अनैतिक व्यापार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन त्यांचेकडून उपजिविका भागवित असतांना मिळून आल्याने कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिला आरोपी विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3 , 4 , 5 , 7 ( अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

तसेच 10 पिडीत महिलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे करुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना सखी वन स्टॉफ सेंटर , जिल्हा रुग्णालय , नंदुरबार येथे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी दाखल करण्यात आलेले आहे . आज रोजी कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिला आरोपी व वेगवेगळ्या राज्यांमधून अनैतिक व्यापार करण्यासाठी आणलेल्या 10 पिडीत महिलांची जिल्हा रुग्णालय , नंदुरबार येथे सविस्तर वैद्यकीय तपासणी करुन दोन महिला आरोपी व 10 पिडीत महीलांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे . त्यानंतर न्यायालयाचे आदेशान्वये 10 पिडीत महीलांना धुळे येथील ममता महिला गृह येथे पाठविण्यात येणार आहे .

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , मा . उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले , स्थानिक गुन्हे शाखेचे सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , महिला सेलचे सहा . पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील परिविक्षा अधिकारी श्रीमती सुरेखा पवार व संरक्षण अधिकारी रविंद्र काकळीज ,

 

 

पोह दिपक गोरे , राकेश वसावे , जितेंद्र तांबोळी , महेंद्र नगराळे , पोलीस नाईक राकेश मोरे , मोहन ढमढेरे , जितेंद्र ठाकुर , सुनिल पाडवी , पोलीस शिपाई शोएब शेख , विजय ढिवरे , अभय राजपुत , आनंदा मराठे , रामेश्वर चव्हाण महिला सेल येथील महिला पोलीस हवालदार विजया बोराडे , प्रिती गावीत , अरुणा मावची जिल्हा विशेष शाखेचे महिला पोलीस नाईक पुष्पा वळवी , सुरेखा पाडवी तसेच पोलस मुख्यालय येथील सहा . पोलीस उप निरीक्षक सलीमोद्दीन काझी, महिला पोलीस अमंलदार कावेरी साबळे यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

संतापजनक बातमी : नवजात बालकांची रुग्णवाहिका चक्क नेली पर्यटनाला, धडगाव ग्रामीण रुग्णालयातील गंभीर प्रकार उघड

Next Post

गणेशोत्सव काळात डी . जे . व डॉल्बी सिस्टिमवर बंदी , वापर केल्यास होणार कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचा इशारा

Next Post
पोलिसांनी उभारलेल्या शिक्षणसेतु नंतर शिक्षकाने व्यक्त केलेल्या भावना होत आहे सोशल मीडियावर व्हायरल

गणेशोत्सव काळात डी . जे . व डॉल्बी सिस्टिमवर बंदी , वापर केल्यास होणार कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add