नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून या अंतर्गत दि.२४ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. ७५ ग्रामपंचायती ६१५ सदस्य पदासाठी १३४ तर ७५ लोकनियुक्त सरपंच पदासाठी आज २७ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३१ तर सदस्यांसाठी १६७ अर्ज दाखल करण्यात आले आहे.
नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची कोरोनामुळे २०२० पासून मुदत संपून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यातच कोरोना निर्बंध असल्याने निवडणुक लांबल्या होत्या. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीसाठी ऑगस्ट महिन्यात निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम घोषीत केला. त्यातर्ंगत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करून पावती निवडणुक अधिकार्यांकडे जमा करणे सुरू आहे.
नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीसाठी ७५ लोकनियुक्त सरपंच तर ६१५ सदस्या पदांसाठी २४ ऑगस्टपासून नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. आज लोकनियुक्त सरपंच पदासाठी २७ तर सदस्य पदासाठी १३४ नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले आहे. आजअखेर एकूण लोकनियुक्त सरपंचपदासाठी ३१ तर सदस्य पदासाठी १६७ अर्ज दाखल करण्यात आला आहे.
लोकनियुक्त सरपंचपदासाठी दाखल अर्ज
अंबापूर १, आष्टे १, बिलाडी १, गंगापूर १, जळखे १, खांमगाव १, नागसर १, ठाणेपाडा १, विरचक १, भांगडा १, निंबोणी १, कोठली ४, नंदपुर ३, शिवपुर १, नटावद १, वसलाई १, वासदरे ४, दहिंदुले बु. १, नांदखे २, कोळदे १, वाघोदा १.
सदस्य पदासाठी अर्ज दाखल
अंबापूर ६, बिलाडी ५, आष्टे ४, गंगापूर ८, जळखे ५, पातोंडा १, खांमगाव १०, नागसर ४, ठाणेपाडा १, विरचक ४, आर्डीतारा ७, भांगडा ७, भवानीपाडा ५, दुधवळ ४, देवपूर ५, निंबोणी १, कोठली २, नंदपुर ७, शिवपुर ७, नटावद ८, वसलाई ८, भोणे २, वासदरे ४, दुधाळे १, नळखे र्खु. २, नांदखे १७, उमर्दे बु. १, खाडसगाव १, कोळदे १२, पळाशी ३, शिंदे ६, वाघोदा ९ नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले.








