शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा जि. नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.

स्पर्धेचे अंतर महिलांकरिता तीन किलोमीटर तर पुरुषांकरिता पाच किलोमीटर ठेवण्यात आले होती.संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करतांना समन्वयक प्रा.पाटील म्हणाले, आजचा युवा हा राष्ट्राची खरी संपत्ती आहे म्हणून विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासासोबत खेळातही भाग घ्यावा.दररोज व्यायाम व काही अंतर धावण्याचा सराव करावा.यातून आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मदत होते. आपल्या संस्थेने अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत, खेळाडूंना सहकार्य करण्यासाठी संस्था सदैव तत्पर आहे.
या स्पर्धेचा अंतिम निकाल असा,महिला गट-:प्रथम – कु.तुलसी मोहन शेमळे,द्वितीय- कु.कविता बिल्या भिल,तृतीय- कु.निकिता भगवान शिरसाट, उत्तेजनार्थ प्रथम- कु.दिव्या संजय जवेरी ,उत्तेजनार्थ द्वितीय- कु.हर्षदा घनश्याम सोनवणे , पुरुष गट-प्रथम- किसन गुलाबसिंग पावरा,द्वितीय- जयेश सुरेश येवले,तृतीय -कैलास संजय शिंदे,उत्तेजनार्थ प्रथम- गोविंद रामा वसावे, उत्तेजनार्थ द्वितीय -विनीत शशिकांत पाटील.विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल, डॉ.एस.डी.सिंदखेडकर, उपप्राचार्या कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश,प्रा.डाॅ.मृणाल जोगी यांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.डाॅ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन व यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक प्रा.डॉ.अरविंद कांबळे, कॅप्टन प्रा.सुभाष भालेराव,प्रा.डाॅ.गोपाल गवई,प्रा.राजेंद्र पाटील, सुनिल भांडारकर, गोपाळ सोनार,दिलवर ठाकरे, महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच क्रीडा विभागाच्या खेळाडूंनी सहकार्य केले.








