नंदुरबार l प्रतिनिधी
येथील वे. खा. भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार येथे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.व्ही.एन.पाटील तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बी.बी. निकुंभ, उपप्राचार्य बी.सी.पवार, कार्यक्रमाचे मार्गदर्शक संतोष मराठे व गणेश मराठे तसेच महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक दिनेश सुर्यवंशी उपस्थित होते. व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख अश्विनकुमार खिंवसरा यांनी केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यार्थिनी कु. साक्षी वसईकर व सूत्रसंचलन कनिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी.बी.पाटील यांनी केली. यावेळी कार्यक्रमाचा सुरवातीला हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी खेळाडू कु. महेक मंगलदास वसावे या विद्यार्थिनीचे मॅरेथॉन व जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थिनी कु. रिद्धी भट हिने हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या विषयी माहिती सांगितली व संतोष मराठे, गणेश मराठे यांनी आत्म संरक्षणाचे धडे व प्रात्यक्षिक करून दाखविले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बी.बी. निकुंभ, उपप्राचार्य बी.सी.पवार, प्राचार्या सौ.व्ही.एन.पाटील यांनी क्रीडा दिवसाचे महत्त्व सांगितले.
क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयात रस्सीखेच स्पर्धा विद्यार्थिनींमध्ये घेण्यात आली.यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते व कार्यक्रमाचे आभार सौ.जे.के.पाटील यांनी मानले.








