शहादा l प्रतिनिधी
तुलसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आयसीयु सेंटर शहादा तसेच परम हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथील तुलसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन शहादा नगरपालिकेचे माजी गटनेता प्रा.मकरंदभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहादा – तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी, भाजपा शहादा शहर अध्यक्ष विनोद जैन, शहादा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ.राजेश जैन उपस्थित होते.
सदर शिबिरासाठी सुरत येथील परम हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ आणि रोबोटीक सर्जन डॉ. भरत सुतारिया, डॉ. निरव सोनी, हृदयरोग तज्ञ डॉ. सुनिल अमिन, नाक कान घसा तज्ञ डॉ. यश लावना या सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी शहादा व परिसरातील रुग्णांची तपासणी केली.
सदर शिबिरात २०० पेक्षा जास्त रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबीरासाठी शहादा येथील तुलसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. राजेश जैन, हर्षल पटेल, हरीश पटेल, संजय सोनवणे, तसेच हॉस्पिटलच्या परिचारिका यांनी परिश्रम घेतले.
यावेळी डॉ प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले की, तुलसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे नेहमीच विविध शिबिराचे वेळोवेळी आयोजन करण्यात येत असते. शहादा व परिसरातील रुग्णांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येत असून त्यांचे रोग निदान करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना त्याच्या लाभ मिळत असतो.








