नंदुरबार | प्रतिनिधी
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, मराठा समाजाला आरक्षण समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अपघातात निधन झाल्याने उमर्दे खुर्दे ता.नंदुरबार येथे समस्त मराठा समाज व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुंबई पुणे महामार्गावर दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे झालेल्या कार अपघात शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव मेटे यांचे दुर्दैवाने निधन झाले.
निधनाची वार्ता कळताच मराठा समाजावर शोककळा पसरली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा आधारस्तंभ म्हणून ज्यांनी आपल्या आमदारकीचा काळात विधानपरिषदेत आणि जनतेच्या व्यासपीठावर कायम या प्रश्नावर सातत्याने आंदोलन, पाठपुरावा, न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते पण अशा मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी धडपडणार्या झुंजार नेत्याचा अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याने रविवार रोजी रात्री ८ वाजता श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक उमर्दे खुर्दे ता.नंदुरबार येथे स्व.विनायकराव मेटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपस्थितांनी विनायक मेटे यांनी जिवनात केलेला संघर्ष आणि संघटना नेतृत्व यांच्या योगदानाबद्दल व कार्यकुशलतेबद्दल मनोगतातून आठवणींना उजाळा दिला.तसेच सर्वांनी सामुहिक श्रद्धांजली वाहिली.
यावेळी दिगंबर जाधव, नरेश कदमबांडे ,संजय गायकवाड ,हिम्मतसिग गिरासे, लोटन जाधव, राहुल घेवारे, सचिन बेद्रे ,स्वप्निल बोराणे ,छब्बीर खाटिक ,गोपाल गिरासे ,अमोल साळुंके,भुषन कदमबांडे ,योगेश गिरासे ,नारायण जाधव यांच्यासह युवक, गावातील मराठा समाज बांधव,ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिंगबर जाधव यांनी केले.








