नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील देवमोगरा नियत क्षेत्र कक्ष क्र.२३ मधून चोरट्यांनी २७ हजार रुपये किंमतीचे तीन लोखंडी गेट व लोखंडी तार चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील देवमोगरा नियत क्षेत्र कक्ष क्र.२३ आहे. सदर कक्षामधून चोरट्यांनी प्रवेश करुन २७ हजार रुपये किंमतीचे तीन लोखंडी गेट व १५० मीटर लोखंडी तार चोरुन नेली.
याबाबत वनरक्षक नयना किसन हाडस यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र वळवी करीत आहेत.








