नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या व गणेश भक्तांच्या अडचणी व तक्रारींसाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत करण्यात आला आहे.
दि.31 ऑगस्ट 2022 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव काळात मंडळांच्या व गणेश भक्तांच्या अडचणी तसेच तक्रारींचे निवारण करण्यसाठी पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार येथे 24 तास हेल्पलाईन सेवा कार्यान्वीत करण्यात आली असून त्याबाबतचा हेल्पलाईन नंबर हा 7620006402 असा आहे .
दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेशाचे आगमन झाल्यापासून ते दि.9 सप्टेंबर 2022 रोजी विसर्जन होईपर्यंत पोलीस विभागाशी संबंधीत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विभागांशी संबंधीत तक्रारींचे तात्काळ निरसन व्हावे याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून सदरचा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे .
पोलीस , महावितरण , नगर पालिका , नगर पंचायत , ग्राम पंचायत , सार्वजनिक बांधकाम विभाग , आरोग्य विभाग व महसुल विभाग यासारख्या विभागांशी संबंधीत असलेल्या अडचणी व तक्रारी याबाबत सदर क्रमांकावर संपर्क साधून द्यावी . तसेच पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी संबंधित विभागाशी संपर्क साधून तक्रारीचे निराकरण करुन घेतील .
तसेच संबंधित तक्रारदार यास तक्रारीचे निराकरण झाले किंवा कसे ? याबाबतची खात्री स्वत : नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील हे करणार आहेत . नंदुरबार जिल्ह्यातील मंडळांबाबत गणेश भक्तांना गणेशोत्सवाशी संबंधीत कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .








