नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ असलेले बॅटरीचे दुकान फोडून सुमारे पावणे चार लाख रुपये किंमतीचे इन्व्हर्टर व बॅटऱ्या चोरुन नेल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ शेख मुस्ताक शेख हसन मन्यार यांचे बॅटरीचे दुकान आहे. मयुर अरुण भामरे, शेख सुफियान शेख रज्जाक मन्यार यांनी सदर बॅटरचे दुकान फोडून त्यातील 3 लाख 65 हजार 306 रुपये किंमतीच्या 16 बॅटऱ्या व 14 इन्व्हर्टर चोरुन नेले.
याबाबत शेख मुस्ताक शेख हसन मन्यार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत मोहिते करीत आहेत.








