नंदुरबार प्रतिनिधी
शहरातील घोडापीर मोहल्ल्यात भांडणाच्या कुरापतीतून चौघांना मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील घोडापीर मोहल्ल्यातील अब्दुल लतिफ शेख अहमद व त्यांची पत्नी, मुलगा सलाम अब्दुल लतिफ शेख व पुतण्या वजीर शेख रफिक यांना भांडणाच्या कुरापतीतून नासिरखान, बिस्मिल्लाखान पठाण, आलीमखान नासीरखान पठाण, रहिमखान नासिरखान पठाण, करीमखान नासिरखान पठाण, हाजीखान नाजिरखान पठाण, तौसिफखान अन्वरखान पठाण व जाकीरखान बिस्मिल्लाखान पठाण सर्व रा.ईलाही चौक, नंदुरबार यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अब्दुल लतीफ शेख अहमद यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात भादंवि कलम 143, 147, 149, 324, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रकाश अहिरे करीत आहेत.








