Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची विविध शासकीय कार्यालयांना भेट, शेत शिवारात जाऊन ई-पीक पाहणी प्रणालीची दिली माहिती

team by team
August 25, 2022
in राज्य
0
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची  विविध शासकीय कार्यालयांना भेट, शेत शिवारात जाऊन ई-पीक पाहणी प्रणालीची दिली माहिती

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज तळोदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, शासकीय धान्य गोडावून येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, तहसिलदार गिरीश वखारे, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल चौधरी, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नियमित कामकाजाचा भाग म्हणून आज तळोदा तालुक्यास भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी चौगाव ब्रु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यानंतर त्यांनी शासकीय धान्य गोडाऊन, तळोदा येथे जावून गोदामाची तपासणी करुन धान्यसाठ्याची माहिती घेतली. तसेच चौगाव ब्रु. येथील स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करुन त्यांना नागरिकांना नियमित धान्य वितरणाच्या सूचनाही दिल्यात.

श्रीमती खत्री यांनी उपजिल्हा रुग्णालय, तळोदा येथे भेट देवून प्रसुती कक्षातील गरोदर मातांशी संवाद साधुन रुग्णालयातील परिचारिकांना प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना स्तनपानाचे महत्व तसेच पोषण आहाराबाबत नियमित मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यानंतर त्यांनी उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयात भेट देऊन प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तसेच इतर शासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पोटखराब क्षेत्राबाबत सुधारीत सातबाराचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

याविविध भेटी दरम्यान रुग्णालय अधिक्षक डॉ. गणेश पाटील, सहायक गट विकास अधिकारी बी. के. पाटील, मंडळ अधिकारी समाधान पाटील, तलाठी सुषमा चौरे, कृषी सहायक गांगुर्डे आदी उपस्थित होते.

‘ई-पीक पाहणीत’ सहभाग नोंदविण्याचे आवाहन

श्रीमती. खत्री यांनी तळोदा तालुक्यातील आमलाड येथील शेतकरी योगेश पाटील या शेतकऱ्यांच्या शेत शिवाराला भेट देऊन ई-पीक पाहणीच्या नव्या प्रणालीची माहिती दिली. ही नवीन प्रणाली पारदर्शक असल्याने शासकीय योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांनी स्वतः ही प्रणाली हाताळायची असून ती अत्यंत सोपी व सुलभ असल्याने सर्व शेतकऱ्यांनी हे नवीन ॲप डाऊनलोड करून ई-पीक पाहणीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध, रेल्वे रॅक पॉइंटला भेटी प्रसंगी खा. डॉ. हिना गावित यांचे प्रतिपादन

Next Post

मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add