Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सिकलसेल पिडीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
August 25, 2022
in क्राईम
0
सिकलसेल पिडीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

धडगाव l प्रतिनिधी

तालुक्यातील सोन खुर्द गावातील जरीपाडा येथे सिकलसेल आजाराने पिडीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास एका कर्मचाऱ्याविरोधात धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवस पिडीत महिलेसह तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. असे असले तरी पिडीत कुटूंबाकडून मात्र संबंधित पोलिसांवर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील सोन खुर्द गावातील जरीपाडा येथे दारु विक्रीच्या संशयावरुन पतीला अटक करण्यासाठी पोलिस कर्मचारी गेले होते. यावेळी पती बाहेरगावी गेले असल्याने महिला घरात एकटी होती. सदर महिलेला तिच्या पतीबद्दल विचारणा करत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

यावेळी संबंधित पिडीत महिला छाया राजेश पटले (वय २८) हिने मी सिकलसेलग्रस्त असून मला मारहाण करु नका, अशी विनवणी पोलिसांना केली. यावेळी मारहाण करणारे पोलिस उपनिरीक्षक राहूल भदाणे व पोलिस कर्मचारी पिंपरे यांना सोबतच्या पोलिसांनीही समज दिली.

त्यानंतर त्यांनी मारहाण करणे थांबविले. सोबत महिला पोलिस कर्मचारी असतांना पोलिस उपनिरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी पिडीत महिला व तिच्या कुटूंबियांच्यावतीने करण्यात आली होती.

सलग तीन दिवस पोलिस ठाण्यात ठाण मांडल्यानंतर संबंधित पोलिस उपनिरीक्षक राहूल भदाणे व पोलिस कर्मचारी पिंपरे यांच्यावर धडगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी नंदनगरीत, मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन

Next Post

श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात सहभाग

Next Post
श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात सहभाग

श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add