Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी नंदनगरीत, मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन

team by team
August 25, 2022
in सामाजिक
0
पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी नंदनगरीत, मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

प.पू.पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे नंदनगरीत येंत असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि.29 व 30 ऑगस्ट रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

शिबीराचा शुभारंभ सकाळी 10 वाजता पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी व मान्यवरांचा उपस्थितीत होणार आहे.

गुरुजी आयुर्वेद नाशिक यांच्या वतीने मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.29 व 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत शिबीर होणार आहे. सदर शिबीर पारेश्‍वर मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, संजीवनी क्लिनिकच्या प्रांगणात भव्य सभामंडपात, लक्ष्मी पावभाजी समोर हॉटेल सायनीच्या बाजूला नळवा रोड नंदुरबार येथे होणार आहे.

या शिबीरात तज्ञ डॉक्टर व महिला डॉक्टरांकडून रूग्णांची तपासणी करण्यात येईल. या शिबीरात गॅस अ‍ॅसिडीटी, कफ खोकला, जुनाट सर्दी, संधीवात, गळ्याचे विकार अस्थमा, आमवात, सायटीका, शित-पीत्त, अर्धशिशी तारुण्यपिटीका, हृदयरोग, मुळव्याध, मुतखडा, केस पिकणे, डायबिटीस, त्वचारोग रक्तदाब, पोटाचे विकार, यांची तपासणी करुन उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान शिबीरासाठी पारेश्‍वर मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, संजीवनी क्लिनिक हॉटेल सायनीच्या बाजूला, नळवा रोड नंदुरबार (मो.9028181915) यांच्याकडे शिबीरासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवचन व समस्यांवर समाधान

भागवत भुषण, ज्योतिषाचार्य प.पू.पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे दि.29 व 30 ऑगस्ट रोजी शिबीराला उपस्थित राहणार असून नागरीकांना त्यांची भेट घेता येईल. नागरीकांना ज्योतिष, विवाह नोकरी, व्यवसाय, समस्या या विषयावर त्यांचे मार्गदर्शन घेता येईल.

तसेच मंगळवार दि.30 ऑगस्ट 2022 रोजी शिबीर स्थळी सायंकाळी 5 वाजता प.पू.पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचे कथा प्रवचन होईल. मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार शिबीर, कथा प्रवचानाचा लाभ घेण्याचे आवाहन गुरुजी आयुर्वेद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव व अक्कलकुवा ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलनाचा आ. ॲड के.सी.पाडवी यांचा इशारा

Next Post

सिकलसेल पिडीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
सिकलसेल पिडीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सिकलसेल पिडीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add