नंदुरबार-
जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी 28 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती,संस्थांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्काराच्या मार्गदर्शक सूचना व अधिक माहिती https://disabilityaffairs.gov.in/ व www.awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.