नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील पंचशील नगरात घरासमोर उभे असलेले चारचाकी वाहन जाळून साडेचार लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा येथील उदयसिंग पांड्या पावरा यांचे मालकीचे चारचाकी वाहन (एम. एच. ३९, जे. ३३६६ ) पंचशील नगरातील त्यांच्या घरासमोर लावले होते.
संशयित शरद अहेर याने द्वेषबुद्धीने काहीतरी ज्वलनशील द्रव्य पदार्थ वाहनावर टाकून पेटवून दिले. यात साडेचार लाख रुपये किंमतीचे वाहन जळून नुकसान केले. याबाबत उदयसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात संशयित शरद अहेर याच्याविरोधात भादंवि कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक छगन चव्हाण करीत आहेत.