नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाची जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हाप्रमुखपदी जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी व माजी जि.प सदस्य किरसिंग वसावे यांची निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हयातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नविन कार्यकारिणीची निवड केले आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शनिवारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र दिले.यावेळी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी,उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,नगरसेवक जगन माळी आदी उपस्थित होते. नवनियुक्त जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्यावर नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्याची तर धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्याची जबाबदारी किरसिंग वसावे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणी याप्रमाणे- जिल्हाप्रमुख- ॲड राम रघुवंशी,किरसिंग वसावे,उपजिल्हा प्रमुख कृष्णदास पाटील (नंदुरबार),भानुदास पाटील (शहादा), राजेश गावीत (नवापूर), धनसिंग पावरा (धडगांव),अहमद हुसैन शहादा (अक्कलकुवा),गौतम जैन (तळोदा)
तालुका प्रमुख- रविंद्र गिरासे (नंदुरबार),राजेंद्र पाटील,बकाराम गावीत ( नवापूर), संदिप वळवी (धडगांव),रायसिंग वळवी (अक्कलकुवा),अनुपकुमार उदासी (तळोदा) महानगर प्रमुख / शहर प्रमुख- विजय माळी (नंदुरबार),रोहन न्हानु माळी (शहादा), भालचंद्र गावीत (नवापूर),दिलवसिंग पावरा (धडगांव), रहीम मक्राणी (अक्कलकुवा), जगदिश परदेशी (तळोदा)