नंदुरबार l प्रतिनिधी
येथील समस्त राजस्थानी ब्राह्मण समाज व समस्त ब्राह्मण पंच यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि.२१ ऑगस्ट रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिचे आयोजन करण्यात आले आहे.
ब्राम्हणवाडी, जयवंत चौक, नंदुरबार येथे उद्या दि.२१ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे भव्य रक्तदार शिबिर होणार असून आपल्या एका रक्तदानाने कोणाचातरी जीव वाचू शकतो, ही भावना घेवून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन एका सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन समस्त राजस्थानी ब्राम्हण समाज नंदुरबारचे अध्यक्ष अनिल शर्मा तसेच समस्त ब्राम्हण पंच नंदुरबारचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केले आहे.