नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा व्यावसायिक फोटोग्राफर असोसिएशन आणि नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएशन तर्फे दि.19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त संयुक्तरीत्या कॅमेरा पूजन करण्यात आले.
दंडपाणेश्वर गणपती मंदिर संस्थानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमानिमित्त कॅमेरा पूजन आणि आगामी वर्षभरात होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी सांगितले की, संघठनातून एकीचे बळ दिसते.छायाचित्रकारांनी लग्न समारंभ व इतर कार्यक्रमामध्ये धावपळ न करता आपल्या कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य द्यावे. यातून संभाव्य अपघातासारख्या घटना टाळता येतील असे सांगितले.तर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांनी सांगितले की, छायाचित्रण व्यवसायाला 183 वर्षाचा इतिहास आहे.फोटोग्राफीच्या माध्यमातून आपले कला, कौशल्य इतरांना कळते.शतकापूर्वी असलेली नंदुरबारची फोटोग्राफी आणि आज बदलत्या काळात अनेक स्थित्यंतरे आली. असे सांगून टपाल विभागाच्या विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी फोटोग्राफी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाजन आणि वैभव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात निवड झाल्याबद्दल असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला.यात श्रीमंत बाबा गणपती मंडळ गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी पियुष सोनार तसेच मुंबईतील राज्यस्तरीय छायाचित्रण स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त नितीन पाटील आणि सहकार भारतीच्या नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री पदी निवड झाल्याबद्दल महादू हिरणवाळे व स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा ध्वज व अमृत महोत्सवी वर्ष प्रतिमा वितरण केल्याबद्दल वैभव थोरात यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
आगामी काळात कौटुंबिक स्नेह मिलन, आरोग्य शिबिर, फोटोग्राफी विषयावर चर्चासत्र आदि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत सर्वांनुमते चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सदस्य महादू हिरणवाळे, जिल्हा व्यावसायिक फोटोग्राफर असोसिएशनचे माजी अध्यक्ष राकेश तांबोळी, गोविंद अग्रवाल, विद्यमान अध्यक्ष संदीप महाजन,
तसेच सदस्य गणेश चौधरी, सागर तांबोळी, मुकेश सोनवणे, प्रफुल्ल निकुंभे, गणेश पारेख, अनिल चव्हाण, अविनाश चौधरी, विष्णू रामचंदाणी, पंकज सोनवणे, कांतीलाल जावरे, जगदीश चव्हाण, अजय बडगुजर, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादू हिरणवाळे यांनी केले तर आभार सागर बारी यांनी मानले.








