नंदुरबार l प्रतिनिधी
पी.जी पब्लिक स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी महोत्सवासह नटखट श्रीकृष्ण लीलांच्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. माखन चोरल्यानंतर गोपिकांच्या तावडीत सापडल्याने भगवान श्रीकृष्ण व त्यांच्या साथीदारांची फजितीच्या देखाव्यातुन लक्ष वेधून घेतले होते.

नंदुरबार येथील चोपाळे शिवारातील श्री. गोवर्धनसिंहजी शैक्षणिक सेवा समिती संचलित पी.जी.पब्लिक स्कूलमध्ये जन्माष्टमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवारी सकाळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण लीलांच्या देखावा सादर केला होता. घरातील दररोजच ‘माखन’ चोरीला जात असल्याने गोपिका हातात झाल्या होत्या. एके दिवशी काही गोपिकांनी श्रीकृष्णांना व त्यांच्या साथीदारांना ‘माखन’ चोरतांना पकडले. ही घटना गोपिकांनी यशोदेच्या कानावर घातली.यशोदा नवल करीत गोकुळात दही दुधाचे पाठ वाहत असतांना कृष्ण ‘माखन’ कसं चोरणार? असा प्रश्न गोपिकांना केला असता मग गोपिकांनीच यशोदेला चोरी पकडून दाखवु असे सांगितले.
त्यानंतर गोपिका देखील श्रीकृष्णां नटखट लीलांच्या मागावर होत्या. याची कल्पना श्रीकृष्ण व त्यांच्या साथीदारांना होते अन एका दिवशी माखन चोरतांना सर्वजण गोपिकांना रंगे हात सापडले. गोपिकांनी झालेला प्रकार यशोदेला सांगितला असता यशोदेने श्रीकृष्णाला शिक्षा म्हणून दोरखंडाने बांधून ठेवल्याच्या देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला होता. या देखाव्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
दहीहंडीची धूम
पी.जी पब्लिक स्कूलमध्ये शुक्रवारी सकाळी दहीहंडी महोत्सवाला उधान आले होते. चित्रपटातील ‘गो गो गोविंदा’,’ ‘आला रे आला गोविंदा आला’ गाण्यावर बेधुंद नृत्य करीत विद्यार्थ्यांनी ३ थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात हंडी न फुटल्याने प्रयत्नांची परकाष्ठा करीत तिसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडली. दहीहंडी फुटताच विद्यार्थी विद्यार्थिनींनी जल्लोष केला. कार्यक्रम संस्थेचे चेअरमन पुष्पेन्द्र रघुवंशी, डायरेक्टर सिद्धार्थ रघुवंशी, मॅनेजिंग डायरेक्टर ॲड.रुद्रप्रताप रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.








