नंदुरबार । प्रतिनिधी
भालेर येथील जि.प.मराठी शाळेत तीन मे 2021 दोन शिक्षकांची जागा रिक्त होती त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत होते.
वर्षभरापासून शिक्षक नव्हते. भालेर जि.प.शाळेत पहिली ते 4 वर्गात सुमारे 62 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . परंतु एकच शिक्षक होता . हि बाब काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांना कळल्यावर त्यांनी मुख्य अधिकारी , शिक्षण अधिकारी तसेच पंचायत समिती सभापती यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून भालेर शाळेत तातडीने शिक्षकाची नेमणूक करण्याची मागणी वेळोवेळी केली .
मागणीची पंडित ठाकरे या शिक्षकाची तातडीने होळ तर्फे रनाळा येथून जिल्हा परिषद मराठी शाळा भालेर येथे प्रतिनियुक्तीवर देण्यात आले आहेत . यामूळे भालेर व परीसरातातील विद्यार्थ्यांचा शैक्षणीक विकास व्हायला मदत होईल . यामुळे तात्पुरती विद्यार्थ्यांची सोय झाली आहे मात्र अद्यापि येथे अजून एक जागा गावातील बालक व तरूणांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भास्कर पाटील नेहमीच कटाक्षाने लक्ष दिले आहे . यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहेत .








