नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब नंदुरबार व ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब वाढदिवस आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.16 ऑगस्ट 2022 रोजी खुली जिल्हास्तरीय रोप स्किपींग (दोरी उडी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा 10, 14 व 14 वयोगटातील आणि खुला प्रवर्गासाठी चार गटात होईल. या रोप स्किपींग स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन ना.डॉ.विजयकुमार गावित वाढदिवस आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांचा वाढदिवसानिमित्त द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब नंदुरबार व ना.डॉ.विजयकुमार गावित वाढदिवस आयोजन समिती नंदुरबारच्या वतीने खुली जिल्हास्तरीय रोप स्किपींग स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.
दि.16 ऑगस्ट 2022 रोजी नंदुरबार शहरातील इंदिरा मंगल कार्यालयात रोप स्किपींग स्पर्धा होईल. ही स्पर्धा 10, 14, 17 वर्षातील व खुला प्रवर्ग अशा चार वयोगटात व सिंगल बाउंस, 30 सेकंड स्पीड, डबल अंडर, 3 मिनीट इंड्युरन्स व फ्रि-स्टाईल या चार प्रकारात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहीागी होणार्या खेळाडूंनी देारी आणावी, सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल. प्राविण्य मिळविणार्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. सर्वाधिक सहभाग नोंदविणार्या शाळेस सन्मानचिन्ह देण्यात येईल.
सर्वाधिक पदक प्राप्त शाळांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे अनुक्रमे सन्मानचिन्ह देण्यात येईल. या खुल्या जिल्हास्तरीय रोप स्किपींग स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब नंदुरबार व ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब वाढदिवस आयोजन समिती नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे.








