Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी खुली मॅरेथॉन स्पर्धा

team by team
August 13, 2022
in राजकीय
0
आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब वाढदिवस आयोजन समितीच्या वतीने राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दि.15 ऑगस्ट 2022 रोजी खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा इ.8 ते 10 तील मुला-मुलींसह पुरुष व महिलांसाठी खुली असणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन ना.डॉ.विजयकुमार गावित वाढदिवस आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांचा वाढदिवस दि.15 ऑगस्ट रोजी असल्याने त्यानिमित्त ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब वाढदिवस आयोजन समितीच्या वतीने खुली मॅरेथॉन स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पहिला गट इयत्ता 8 ते 10 वीसाठी 6 कि.मी.अंतर मुले, महिला गट इयत्ता 8 वीे 10 साठी 6 कि.मी.अंतर मुलींकरीता, पुरुष गट खुला असून 20 कि.मी.अंतर आणि महिला गट देखील खुला असल्याने 10 कि.मी.अंतराची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.

 

मुले व मुलींच्या गटासाठी प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 2 हजार रुपये तसेच पुरुष व महिलांच्या गटासाठी प्रथम पारितोषिक 7 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 5 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 3 हजार रुपये असे प्रत्येकी पारितोषिक गटानुसार अनुक्रमे असेल.

 

सदरच्या चारही गटातील मॅरेथॉन स्पर्धांना ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानापासुन सुरुवात होणार आहे. मुले व मुलींच्या 6 कि.मी.अंतरासाठी ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे निवासस्थापासुन यशवंत विद्यालय, आयटीआय, अंधारे चौक, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक, नेहरु पुतळा, गांधी पुतळा, उड्डाणपुल, गिरीविहार गेट येथुन पुन्हा त्याच मार्गाने येवुन ना.डॉ.गावित यांच्या निवासस्थानी मॅरेथॉनचा समारोप होईल. तसेच महिलांच्या 10 कि.मी. अंतराची मॅरेथान स्पर्धा ही ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे निवासस्थापासुन यशवंत विद्यालय, आयटीआय, अंधारे चौक, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक, नेहरु पुतळा, गांधी पुतळा, उड्डाणपुल, गिरीविहार गेट, स्वागत पेट्रोलपंप, करण चौफुलीजवळून पुन्हा त्याचमार्गाने ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानाजवळ येईल.

 

पुरुषांच्या 20 कि.मी.अंतरासाठी ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे निवासस्थापासुन यशवंत विद्यालय, आयटीआय, अंधारे चौक, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक, नेहरु पुतळा, गांधी पुतळा, उड्डाणपुल, गिरीविहार गेट, स्वागत पेट्रोलपंप, करण चौफुली, पातोंडा, कृष्णा इंटरनॅशनल स्कुलपासुन पुन्हा त्याचमार्गाने ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानाजवळ येवुन समारोप होईल, याप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग असेल. या स्पर्धेसाठी दि.14 ऑगस्टपर्यंत प्रवेश स्विकारण्यात येणार आहे. या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन ना.डॉ.विजयकुमार गावित वाढदिवस आयोजन समितीने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा विना खात्याचे मंत्री ध्वजवंदन करणार : माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात

Next Post

लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन एकास मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
लहान शहादा येथे वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जखमी

लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन एकास मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add