Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे ११०७ फूट भव्य तिरंगासह तीन हजार विद्यार्थ्यांनी काढली भव्य रॅली

team by team
August 12, 2022
in राज्य
0
नवापूर येथे ११०७ फूट भव्य तिरंगासह तीन हजार विद्यार्थ्यांनी काढली भव्य रॅली

नंदुरबार l प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवापूर शहरात आज जिल्हा पोलीस दल नंदुरबार, नवापूर तालुका प्रशासन व दैनिक पत्रकार संस्था यांच्या वतीने 1 हजार 107 फुट लांब व 10 फुट रुंद असलेल्या भव्य तिरंगा रॅली संपन्न झाली.

यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार मंदार कुलकर्णी, जि.प.सदस्य संगिता गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगरपालिका मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर, तालुका गटविकास अधिकारी सी.के. माळी, महिला बालकल्याण अधिकारी संजय कोंडार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, अशोक मोकळ, मनोज पाटील विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या भव्य तिरंगा रॅलीस जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील तसेच प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होवून वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानातंर्गत ही भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांच्या सहभागने नवापूर शहरात एक ऐतिहासिक व अभूतपूर्व असे देशभक्तीने भारावलेले वातावरण यावेळी निर्माण झाले होते. शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीवर ठिकठिकाणी नागरिक महिला, पुरूषांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. रॅलीत चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सजीव देखावा सादर केला होता.

शहरात सामुहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर शहरातील वरिष्ठ महाविद्यालपासून तिरंगा रॅलीस प्रारंभ होवून बस स्थानक, मेन रोड, लाईट बाजार, लिंबडा वाडी, महात्मा गांधी पुतळा, कुंभारवाडा, शिवाजी रोड, श्रीदत्त मंदिर, श्रीराम मंदिर, सरदार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गावरुन निघुन या रॅलीचा श्री शिवाजी हायस्कुल येथे समारोप करण्यात आला. या रॅलीसाठी राहुल टिभे यांनी १ हजार १०७ फुट लांब आणि १० फुट रुंद तिरंगा उपलब्ध करून दिला होता.

 

या रॅलीत नागरीक, सर्व नगरसेवक, पत्रकार, सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच सुमारे 2 ते 3 हजार विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले तर सूत्रसंचालन भटू जाधव तर आभार तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी मानले. सामूहिक राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आवाहन

Next Post

बांधकाम व्यवसायीकाची फसवणूक करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला 7 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख दंडाची शिक्षा

Next Post
बांधकाम व्यवसायीकाची फसवणूक करणाऱ्यास न्यायालयाने  ठोठावला 7 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख दंडाची शिक्षा

बांधकाम व्यवसायीकाची फसवणूक करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला 7 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख दंडाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add