Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बांधकाम व्यवसायीकाची फसवणूक करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला 7 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख दंडाची शिक्षा

team by team
August 12, 2022
in क्राईम
0
बांधकाम व्यवसायीकाची फसवणूक करणाऱ्यास न्यायालयाने  ठोठावला 7 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख दंडाची शिक्षा

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील बांधकाम व्यवसायीकाची फसवणूक करणाऱ्यास न्यायालयाने 7 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख 2 हजार रुपये दंडाची शिक्षा
ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन वसंत धामणे रा . प्लॉट नंबर 12 ( अ ) , मथुरा किसन नगर , शिरपुर जि . धुळे हे शासकीय बांधकाम काँट्रॅक्टर असून जुबेर अली युनुस अली सैय्यद याने चेतन धामणे यांना बांधकाम मटेरीयल होलसेल दराने देतो असे सांगून दि. 4 फेब्रुवारी 2021 ते दि.5 मार्च 2021 रोजी दरम्यान बांधकाम मटेरीयलचे 14 लाख 13 हजार 060 रुपये रोख ॲडव्हान्समध्ये घेवून बांधकाम मटेरीयलचे साहित्य न देता चेतन धामणे यांची फसवणूक केली म्हणून चेतन धामणे यांच्या तक्रारीवरून दि
5 अगस्त 2021 रोजी उपनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 406,409,420,504,506 अन्वये जुबेर अली युनुस अली सैय्यद रा . विष्णू नगर , निझामपूर ता.साक्री जि . धुळे याच्याविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याबाबत आरोपी नामे जुबेर अली युनुस अली सैय्यद यास तात्काळ अटक करण्यात आली होती . उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक देविदास सोनवणे यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते . तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी जुबेर अली युनुस अली सैय्यद याच्याविरुद्ध दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार विनोद चव्हाण यांच्या न्यायालयात 59 दिवसातच सादर केले होते . मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांनी साक्षीदारांचे जबाब , पंच , आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष यासर्व बाबींचा विचार करुन आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असतांनाच खटला चालविण्याचे ठरविले मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांनी अतिशय जलदगतीने खटला चालवुन खटल्याची सुनावणी पुर्ण करुन आरोपी जुबेर अली युनुस अली सैय्यद यास आज दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी 7 वर्ष सश्रम कारावास व 13 लाख 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .

सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे , उपनगर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक देविदास सोनवणे यांनी केला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड . सुनिल पाडवी यांनी पाहिले होते . पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हवालदार दिपक डुमकुल यांनी कामकाज केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे ११०७ फूट भव्य तिरंगासह तीन हजार विद्यार्थ्यांनी काढली भव्य रॅली

Next Post

नंदुरबार 75 व शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान, आचारसंहिता लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add