नंदुरबार| प्रतिनिधी
विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त भारतीय किसाना सेना व भिलीस्थान लॉयन सेना व कांतालक्ष्मी शहा नेत्र रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि.७ ऑगस्ट रोजी बिलाडी (ता.नंदुरबार) येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे भिलीस्थान लॉयन सेना प्रदेशाध्यक्ष पंडीत तडवी यांनी केले आहे.
नेत्र तपासणी कांतालक्ष्मी शहा नेत्र रूग्णालय नंदुरबार यांच्या नेत्र विशेषतज्ञ यांच्यातर्फे तपासणी केली जाईल, शिबीरात नेत्र संबंधातील सर्व रोगांवर योग्य इलाज केला जाईल, विदेशी लेन्स, फॅको सर्जरी व टॉपिकल फॅको माफत दरात सुविधा, शिबीरातील मोतिबिंदूच्या योग्य रूग्णांना निवडून शस्त्रक्रियेसाठी वाहनाद्वारे रूग्णालयात नेले जाईल व ऑपरेशन झाल्यावर शिबीराच्या ठिकाणी सोडण्यात येईल,
बीपीएल रेशकनकार्ड धारक व गरजू रूग्णासाठी विनामुल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन भिलीस्थान लॉयन सेना प्रदेशाध्यक्ष पंडीत तडवी, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष नेरकर, भारतीय किसान सेना जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, जिल्हाध्यक्ष अंकत वळवी, धुळे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, धुळे महिला जिल्हाध्यक्षा सुकमाबाई सोनवणे, रविंद्र मोरे, तालुकाध्यक्ष बिंदास गावीत, तालुका उपाध्यक्ष रविदास वळवी, नंदुरबार भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव यांनी केले आहे.








