नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे भाजपातर्फे महिला मोर्चा शहराध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची नियुक्ती करण्यात आली असुन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी नियुक्ती पत्र देण्यात आले.
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय नंदुरबार विजयपर्व येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी काजल मच्छले यांची महिला मोर्चा शहराध्यक्ष पदी तर सोनाली काशीकर यांची महिला मोर्चा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.
या प्रसंगी उपस्थित जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल उपस्थीत होते.








