नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील हनुमान पेट्रोल पंपाच्या मागे भांडण सोडविण्यासाठी गेले असता चौघांना मारहाण केल्याप्रकरणी १७ जणांविरूध्द नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील अंकुश सखाराम चित्रकथे यांचे मालक शरद चित्रकथे यांच्या नातेवाईकांना ८ ते १० जण मारहाण करीत होते.
यावेळी अंकुश चित्रकथे यांनी मारहाण का करीत आहे असे विचारले. याचा राग आल्याने सुरेश गंगाराम चित्रकथे, महेंद्र सुरेश चित्रकथे, सोनू संजू चित्रकथे, गोलू गण्या चित्रकथे, लकी संजू चित्रकथे, मोन्टी संजू चित्रकथे व इतर १० इसमांनी काठीने डोक्यावर मारुन दुखापत केल्याने रक्तस्त्राव झाला.
तसेच अंकुश चित्रकथे यांचे शालक शरद चित्रकथे यांची आई रंगूबाई, बहिण माया व वहिणी गंगा यांना लक्ष्मीबाई संजू चित्रकथे हिने मारहाण केली. याबाबत अंकुश चित्रकथे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात १७ जणांविरोधात भादंवि कलम ३२६, १४३, १४७, १४९ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.








