Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण पाहणीच्या 79 व्या फेरीस सुरूवात

team by team
August 5, 2022
in राष्ट्रीय
0
जिल्ह्यात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण पाहणीच्या 79 व्या फेरीस सुरूवात

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 79 व्या फेरीच्या क्षेत्र कामास नंदुरबार जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली आहे. या पाहणीच्या अनुषंगाने आपल्या कुटुंबास भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यास अचूक व आवश्यक ती संपूर्ण माहिती देऊन या राष्ट्रीय कामास सर्व क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पोलीस पाटील, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी व स्थानिक कर्मचारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी अशोक पाटील यांनी केले आहे.

 

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या कक्षेत येणाऱ्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी जुलै 2022 ते जून, 2023 असा असणार आहे. हा कालावधी प्रत्येकी 3 महिन्यांच्या 4 उप फेऱ्यांमध्ये विभागलेला असून हे सर्वेक्षण नागरी आणि ग्रामीण भागात सुरू झाले आहे. राज्यात 516 ग्रामीण व 912 नागरी वस्ती समुह घटकांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. यापैकी नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागात 20 आणि नागरी भागात 30 वस्ती समूहांची निवड करण्यात आली आहे.

या पाहणी अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षेत्र काम सुरू झाले असून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे कर्मचारी माहिती संकलनासाठी त्यांना निवडून दिलेल्या वस्ती समूहास (नागरी किंवा ग्रामीण) प्रत्येक कुटुंबांस प्रत्यक्ष भेट देऊन प्राथमिक माहिती प्रश्नावलीच्या आधारे नोंदवून घेणार आहे. त्यानंतर त्या वस्तीतील अथवा नागरी समूहातील निवडक कुटुंबाची अधिकची माहिती संकलित करणार आहे. हे राष्ट्रीय महत्वाचे काम असल्याने सर्व क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पोलीस पाटील, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी व स्थानिक कर्मचारी यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या माहिती संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

 

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 79 व्या फेरीचा विषय शाश्वत विकास ध्येयाशी निगडित सर्वेक्षण आणि आयुष उपचार पद्धतींचे अवलंबन व माहिती अशा दोन भागात विभागण्यात आला आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आणि देशाने स्वीकारलेल्या 17 शाश्वत विकास ध्येयांशी निगडित असणाऱ्या विविध निर्देशांकाची माहिती संकलित करणे, हा या फेरीचा मुख्य उद्देश आहे.

संकलित केलेल्या माहितीचा उपयोग राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील जनकल्याणाचे विविध निर्णय घेणे, धोरण ठरविणे, प्रचलित धोरणात योग्य ते बदल करणे आणि योजना तयार करणे किंवा सुधारित करणे इत्यादी कामांसाठी हे निष्कर्ष फार उपयुक्त असून त्या आधारे वरील कामे शासन स्तरावर करण्यात येतात.

त्यामुळे या माहितीत अचुकता, वस्तुनिष्ठता व सत्यता यांना उच्च दर्जाचे महत्व आहे. संकलित केलेली माहिती कोणत्याहीस्तरावर परस्पर प्रसिद्ध करण्यात येत नसून त्या माहितीच्या आधारे केवळ वरील परिच्छेदातील विषयांनुसार एकत्रित स्वरूपाचा अहवाल तयार करण्यासाठी मुख्य कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, रुम नंबर 221, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुबरार (02564-210044) या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dso.nandurbar@hotmail.com येथे संपर्क साधावा.

सर्वेक्षणात याबाबींचा असणार समावेश

लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या विषयांतर्गत पिण्याचे सुरक्षित व शुद्ध पाणी, स्वच्छतेच्या सुविधांचा वापर व स्वच्छतेच्या सवयींचा अंगिकार मोबाईल फोन व संगणक असणाऱ्या पुरुष व महिलांचे प्रमाण, वैयक्तिक इंटरनेट सुविधा वापरकर्त्यांचे प्रमाण, बँक खाते असले प्रौढ व्यक्ती व महिलांचे प्रमाण, 5 वर्षाच्या आतील बालकांच्या जन्मनोंदणीचे प्रमाण, 1 किंवा ½ किमीच्या आत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध असणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण, प्रौढ व्यक्ती व युवक यांचा शैक्षणिक सहभाग, मागील वर्षभरात कुटुंबातील व्यक्तींवर केलेला वैद्यकीय खर्च इत्यादी प्रमुख निर्देशकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

 

आयुष उपचार प्रणालीची माहिती संकलित करतांना आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग, निसर्गोपचार, होमिओपॅथी इत्यादी भारतीय पारंपारिक उपचारपद्धतींचा उपचार घेतलेल्या कुटुंबाचे प्रमाण तसेच या उपचार पद्धतीविषयी तोंडओळख किंवा माहिती असलेल्या कुटुंबांचे प्रमाण ही माहिती प्रामुख्याने संकलित करण्यात येणार आहे. या अंतर्गत, आयुष उपाचारावर केलेला खर्च, आयुष उपचारपद्धती अंतर्गत दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे प्रमाण, बाळाच्या जन्मापूर्वी आणि नवजात शिशु यांच्यासाठी आयुष उपचारपद्धतीचा वापर या माहितीचा समावेश असणार आहे. यासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने माहितीचे विहित नमुने उपलब्ध केलेले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात चौघांना मारहाण ; १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

चंदनाचे झाडे शेताच्या बांधावर लावून उत्पन्नात वाढ करा: आ. आमश्या पाडवी

Next Post
चंदनाचे झाडे शेताच्या बांधावर लावून उत्पन्नात वाढ करा: आ. आमश्या पाडवी

चंदनाचे झाडे शेताच्या बांधावर लावून उत्पन्नात वाढ करा: आ. आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add