नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नवा गवळीवाडा परिसरातील नागाई फाउंडेशनतर्फे स्व.वामन पोपट चौधरी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त श्रावण महिन्याचे औचित्य साधून सुमारे 500 भाविकांना मोफत बेलपत्र रोपांचे वितरण करण्यात आले.
नगर पालिकेच्या सभागृहात आयोजित नागाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन चौधरी यांच्या संकल्पनेतून आणि चाळीसगाव येथील शुभ डेव्हलपर्सचे संचालक भारत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला.या अनोख्या उपक्रमानिमित्त भाविकांनी बेलपत्र रोपांचे लाभ घेऊन समाधान व्यक्त केले. गुरुवारी सकाळी धुळे नाक्यावरील नगर पालिकेच्या सभागृहात बेलपत्र वृक्ष वाटपाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी नागाईदेवी मंदिराचे मुख्य पुजारी 1008 प्रणवगिरीजी महाराज, नारायण चौधरी, अशोक चौधरी, अंजना चौधरी, श्रीमती वंदना चौधरी, मिना चौधरी, वर्षा चौधरी, दिपाली चौधरी, सचिन चौधरी, हेमंत चौधरी, भरत चौधरी, आकाश चौधरी, यश चौधरी, कृष्णा चौधरी, कुणाल चौधरी, राज चौधरी, हर्षल चौधरी, नेहल चौधरी यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








