नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चितवी गाव शिवारात शेती हिस्से वाटणीवरून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील चितवी गावशिवारात असलेल्या गट क्र. ९३/२ येथे दिलीप गावीत व त्यांचे नातेवाईक काम करीत असतांना कथ्थु गावीत यांनी जमाव जमवून शेती हिस्से वाटणीच्या कारणावरून दिलीप गावीत यांना लोखंडी पाईपने व त्यांचे वडील यांना हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत दुखापत केली.
याप्रकरणी दिलीप दाव्या गावीत रा.बंधारपाडा (ता.नवापूर) यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात कथ्थु होडया गावीत, जोबाबाई कथ्थु गावीत, दिलीप कथ्थु गावीत, देसवंत कथ्थु गावीत, राकेश कथ्थु गावीत सर्व रा. चितवी (ता.नवापूर) यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, १४३, १४७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण कोकणी करीत आहेत.








