अक्कलकुवा । प्रतिनिधी
तालुक्यातील याहामोगी शेतकरी कोयलीविहिर येथील उत्पादक कंपनीच्या वतीने अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा व चंदन रोप वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
कार्यक्रम सदर कोयलीविहिर येथील याहामोगी निवास दि.४ जुलै रोजी ११ येथे सकाळी वाजता होणार आहे . या मेळाव्याला पीक संरक्षण विशेषज्ञ पद्माकर कुंदे , कृषी विशेषज्ञ उमेश पाटील , उद्यानविद्या विशेषज्ञ देसले , कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य राजेंद्र दहातोंडे , जिल्हा कृषी अधिकारी निलेश भागेश्वर आदी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत .
तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहावे व चंदन रोपांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ . आमश्या पाडवी यांनी केले आहे .








