Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महामार्गावर पिकअपच्या धडकेत पादचारी शेतकऱ्याचा मृत्यू

team by team
August 1, 2022
in क्राईम
0
महामार्गावर पिकअपच्या धडकेत पादचारी शेतकऱ्याचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मासलीपाडा शिवारात बर्डीपाडा येथील शेतकरी आपल्या शेतात पायी चालत जात असताना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकपने धडक दिल्याने शेतकरी सुदाम गावित यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सुदाम जोलक्या गावित (वय 50) रा. बर्डीपाडा, ता.नवापूर यांचे शेत महामार्गाच्या पलीकडे मासलीपाडा शिवारात असल्याने सकाळी आपल्या शेतात कामानिमित्त जात असताना सुरतहुन धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहन (क्र.एम. एच.०४, ई. वाय.२४१७ ) वाहन चालकाने खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या कडेने पायी चालत जाणारे शेतकरी सुदाम गावित यांना मागून जबर धडक देत पिकप वाहन अंगावरून चढवत फरपट नेल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर पिकप वाहन चालक देविदास रतन पाटील रा. बांबुर्ली खंडाला, जिल्हा धुळे याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करून वाहन थांबविले. असता चालकाने उतरून ऊसाच्या शेतामधून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

खाली कोसळलेल्या सुदाम गावित यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, असून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांना मृतदेह ताब्यात दिल्यावर बर्डीपाडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे.

घटनास्थळी विसरवाडी पोलीस जमादार दिलीप गावित, कॉन्स्टेबल दारासिंग पावरा यांनी दाखल होत, पंचनामा केला असून मयताचा मुलगा रसिक सुदाम गावित यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप गावित हे करत आहे. पिकअप वाहन चालकाच्या चुकीमुळे घरातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने मयताच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीचा पतीने दोरीने गळफास लावून केला खून

Next Post

महसुल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्या सन्मान सोहळा, श्रीमती. अस्मिता रघुवंशी यांचा करण्यात आला गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add