तळोदा l प्रतिनिधी
कॉग्रेस खा.अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती दौपदी मूर्मू यांच्या बद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणीचा तक्रार अर्ज राजेंद्र राजपूत यांनी तळोदा पोलीसात दिला आहे.
तक्रारी अर्जात नमूद केले आहे की.खा.अधिरंजन चौधरी यांच्यावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंद करावा अशी तक्रार केली आहे. एका न्युज चॅनेलचे मुलाखत दरम्यान भारतीय संविधानातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा अपमान केला आहे. केवळ राजकीय हेतुने प्रेरित होऊन स्वतःचा प्रसिध्दीसाठी देशातील सर्वोच्च पदस्थ व्यक्ती बद्दल अंसंदिग्ध शब्दाचा वापरुन व त्यास प्रसिध्दी देऊन देशातील वातावरण गढूळ करणे व असंतोष पसरविणे
हे कृत्याचा काय परिणाम होईल हे सर्व माहित असतांना केलेले कृत्य हे दाखलपात्र गुन्ह्यास पात्र आहे. नवीन कोणीही असे पुन्हा कृत्य करू नये यासाठी कॉग्रेस खा.अधीर रंजन चौधरी यांच्याविरूध्द भा.द.वि. १५३ (ब), ५०५ (२) व अ.जाती, अ.जमाती अत्याचार प्रतिबंधित कायद्याचे कलमान्वयें गुन्हा नोंद व्हावा व जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असे अर्जात म्हटले आहे.








