तळोदा l प्रतिनिधी
येथील भोई समाज नवयुवक मंडळ तळोदा यांची आज गणेश उत्सव निमित्त बैठक आयोजित केली होती, यात गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमोल वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
भोई समाज पंच मंडळाचे अध्यक्ष धनलाल भोई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.यात उपाध्यक्ष हिरालाल भोई,सचिव सचिन तावडे,कार्याध्यक्ष महारु साठे खजिनदार पवन मोरे, यांची निवड करण्यात आली.
या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष जालंधर भोई,गणेश शिवदे,चंद्रकांत भोई,मधुकरराव रामोळे,धनराज सोनवणे,जगदीश वानखेडे,राहुल शिवदे,चंद्रकांत साठे आदी सह समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी गणेश उत्सव दरम्यान सामाजिक तसेच विविध समाज उपयोगी कार्य करण्याचे नियोजन करण्यात आले.