नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मोदीलालपाडा येथे शेत जमिनीचा वाद मिटविण्यासाठी पाच लाख रुपये दिले नाही या कारणावरुन चौघांना कुऱ्हाड, धाऱ्या व लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सुमारे १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील मोदीलालपाडा येथील लालसिंग पारशी तडवी यांनी शेतजमिनीचा वाद मिटविण्यासाठी पाच लाख रुपये दिले नाही. या कारणरावरुन लालसिंग तडवी यांना मोत्या फुरता पाडवी याने कुऱ्हाडीने हातावर मारुन दुखापत केली. विलास जयराम पवार हा धाऱ्याने वार करणाचा प्रयत्न करीत असतांना नबल्या हांद्या वळवी यांनी धाऱ्या हिसकावून घेतला.
तसेच किसन सत्या वळवी, रमेश कागडा डोमखले, भांगडा जात्र्या वसावे यांनाही जयराम रायसिंग पवार, करणसिंग, मुन्ना कथ्थू पवार, गोरक भामण्या वळवी, सत्या सतिलाल पवार, कैलास उदयसिंग पवार, वना भामण्या वळवी व त्यांच्या सोबत असलेले इतर सात जणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत लालसिंग तडवी यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात सुमारे १५ जणांविरुद्ध भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १०९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाबसिंग पावरा करीत आहेत.