नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे रात्रीच्यावेळी चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या आडोश्याला कुवरसिंग केसरसिंग वळवी रा.तोंडल्याफळी ता.अक्कलकुवा, खापर येथील कोराई चौफुलीजवळ आडोश्याला जगदिश नरेश वसावे रा.तोंडल्याफळी ता.अक्कलकुवा व गणेश संभू पाडवी रा.मोठीफळी ता.अक्कलकुवा हा खापर गावातील यात्रा मैदानाच्या आडोश्याला चोरी करण्याच्या उद्देशाने तिघेजण लपून बसलेले आढळून आले.
याबाबत अक्कलकुवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.