नंदुरबार l प्रतिनिधी
खानदेशातील प्रसिद्ध कानुबाई मातेची आज स्थापना होणार असून कानुबाईच्या मुखवट्यांचे मिरवणूक काढून काल जल्लोष साजरा करण्यात आला.
नंदुरबार शहरात रविवारी प्रसिद्ध असा कानुबाई मातेचा उत्सव साजरा होणार आहे. त्यासाठीच ज्या घरात कानुबाईची स्थापना होणार आहे त्याच्याकडे वाजत गाजत कानुबाईच्या मुखवट्यांचे आगमण काल झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी आणि शनिवारी अनेक घरात कानुबाईच्या मुख्यवट्याचे स्वातगासाठी अबालवृद्ध पारंपारीक नृत्यात दंग होतांना दिसुन आले. यानंतर पारंपारीक पुजनाने घरात कानुबाईचे मुखवट्यांनी प्रवेश केला आहे. खान्देशचा प्रसिद्ध कानुबाई उत्सव आकर्षणाचे केंद्रबिंदु असतो.
कन्हेरेची कानुबाई म्हणजे कन्हेर म्हणजे शंकर भगवानचा अवतार व कानुबाई माता म्हणजे पार्वती मातेचा अवतार म्हणून कानूबाई मातेला कन्हेरची कानुबाई म्हणतात.
खान्देशात गेल्या 80 ते 90 दशकापासून मातेची स्थापना होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात कानुबाई मातेचा उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र होते आणि यावर्षी ही त्याचा परिणाम दिसून येत आहे.
कानुबाई मातेच्या मुखवटे बनविण्यासाठी मुखवटे दुरुस्ती करणे १२०० रुपये रंगकाम ७०० रुपये व नवीन कानुबाई चे मुखवटे घडविणे 2500 रुपये ते 3000 रु एवढा खर्च लागत असतो . हे सर्व मुखवटे मेना पासून बनविण्यात येते .
काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुखवटे तयार होत असतात आणि त्या मुखवट्यांचे जास्त पैसे आकारले जातात . खरंतर नारळ व पिवळ्या व काळ्यामेना पासून तयार केले जाणाऱ्या मुखवट्यांना धार्मिक दृष्ट्या जास्त महत्त्व आहे ज्येष्ठाच्या माहितीनुसार मेनाने केलेली कानबाई हे नवसाला पावते असे सांगितले जाते.
यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात 400 ते 600 जणांकडे कानुमातींची घरोघरी स्थापना केली जाणार आहे .देवीच्या दोन दिवसाच्या उत्साहासाठी भाविक सज्ज झाले आहेत.