नंदुरबार l प्रतिनिधी
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळील कच्चा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. पावसाचा जोर कमी झाल्याने पूल दुरुस्ती नंतर अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
काल संध्याकाळी पुराचे पाणी पुलावरून जात असतानाही अवजड वाहन चालकांनी जीव धोक्यात घालून वाहने काढण्यास सुरुवात केल्यानंतर विसरवाडी पोलिसांनी वाहतूक बंद केली होती.
आज सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नादुरुस्त पूल दुरुस्त केल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आल्याने धुळे व सुरत कडे जाणारी वाहतूक पूर्व पदावर आली आहे.